समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा - प्रा. विजयकुमार जोखे - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2019

समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा - प्रा. विजयकुमार जोखे


 मौजे कार्वे (ता. चंदगड) येथे बुवाबाजी आणि चमत्काराचे प्रयोग सादर करताना प्रा. विजय कुमार जोखे आणि उपस्थित श्रोतावर्ग
मजरे कार्वे / प्रतिनिधी
कर्मकांडावर विश्वास न ठेवता समाजाने वैज्ञानिक दृष्टीकोनातून सर्व घटनांची चिकित्सा करावी. फलज्योतिष आणि जन्म कुंडली  अवैज्ञानिक आहे. भोंदूगिरी हा कायद्याने गुन्हा आहे .चमत्काराच्या प्रयोगातून समाजाची दिशाभूल करून स्वतःचे पोट भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तरी समाजाने डोळसपणे निर्भय बनून चिकित्सक व्हावे असे प्रतिपादन प्रा. विजयकुमार जोखे यांनी केले. ते मौजे कारवे ( ता.चंदगड ) येथील सरस्वती वाचनालय च्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना 'बुवाबाजी व चमत्काराचे प्रयोग ' सादर करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी बाळासाहेब कालकुंद्रीकर होते .   
रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. एम. एम. तुपारे आणि जानबा दुकळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले . स्वागत व प्रास्ताविक सूर्याजी ओऊळकर यांनी केले .व्याख्यानमालेचे उद्घाटन नारायण ओऊळकर यांच्या हस्ते  फीत कापून झाले .पाहुण्यांची ओळख डॉ.प्रकाश दुकळे यांनी करून दिली. चमत्कारांच्या विविध प्रयोगांचे सादरीकरण प्रा. विजयकुमार जोखे यांनी करून त्यामागचे विज्ञान आणि चलाखी लोकांना पटवून दिली. प्रेक्षकांच्या सहभागातून चमत्काराचे प्रयोग केल्याने ते सर्वांना भावले. या प्रसंगी  बालवाचक आणि प्रौढ वाचक गटातील निवडक वाचकांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमास द . य .कांबळे , जोतिबा आपके ,शिवाजी पाटील, निंगाप्पा  पाटील, शिवाजी चाळूचे ,व्ही.जे.पाटील ,अनिल तळवळकर, नारायण पाटील , दयानंद भोगण यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन मधुकर कांबळे यांनी तर आभार जॉनी फर्नांडिस यांनी मानले.                   

No comments:

Post a Comment