![]() |
चंदगड येथे दौलत कारखान्याबाबत कामगार, सभासद व संचालक मंडळाच्या बैठकीवेळी बोलताना अथर्व कंपनीचे चेरअमन मानसिंग खोराटे, शेजारी गोपाळराव पाटील, ॲड. संतोष मळविकर, संग्राम कुपेकर आदी. |
चंदगड / प्रतिनिधी
साखर कारखान्याचा कामगार व उत्पादक शेतकरी हा
कणा आहे. ऊसाच्या बियाणापासून ते रिकव्हरीपर्यंत मी सर्व गोष्टीचा अभ्यास केला
आहे. उत्पादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांनी मदत करावी अन्यथा मी काहीही करु शकत नाही. मी
व्यावसायिक असल्यामुळे मला राजकारणात रस नाही. दौलत कारखाना घेतल्यानंतर काही कठोर
निर्णय घ्यावे लागतील. मात्र त्यातून दौलतचे भलेच होईल. दौलतला गतवैभव प्राप्त
करुन देण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील. यासाठी तालुक्यातील नेतेमंडळी व जनतेने
गट-तट बाजुला ठेवून दौलतसाठी सर्वतोपरी सहकारी करावे असे आवाहन अथर्व कंपनीचे
चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केले. चंदगड येथे दौलत कारखान्याबाबत आयोजित कामगार,
सभासद व संचालक मंडळाच्या बैठकीवेळी ते बोलत होते. दौलच बचाव कृती समितीचे अध्यक्ष
ॲड. संतोष मळविकर व
कामगारांनी ही बैठक बोलावली होती.
प्रारंभी अथर्व कंपनीचे चेअरमन मानसिंग
खोराटे यांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. अथर्व कंपनीचे चेअरमन श्री.
खोराटे पुढे म्हणाले, ``अथर्व कंपनी गेली अनेक
वर्षे साखर व्यवसायात आहे. इतर कारखान्यांची साखर विक्री करण्याचे काम आम्ही केले
आहे. त्यामुळे साखरेबाबत आम्हाला पुर्ण अभ्यास आहे. कोणाचेही देणी थकणार नाहीत.
मागील देण्याबाबत चर्चा करुन तोडगा काढला जाईल. पहिल्या वर्षी 5 लाख टन गाळपाचे
उदिष्ट आहे. कामगार वर्गही भविष्यात चारचाकीने कारखान्यातील येतील यासाठी माझे
प्रयत्न असणार आहेत. त्याचबरोबर कारखान्यावर पर्यटक फिरायला येतील असा कायापालट
करण्याचा मनोदय आहे. दौलतवर सद्या 162 कोटीचे कर्ज आहे. अजूनही काही कर्ज असल्याचे
काही लोक संपर्कात आल्यानंतर समजत आहे. राजकारण बाजूला ठेवून जनतेने साथ दिल्यास
त्यांना निराश करणार नसल्याची ग्वाही दिली.``
![]() |
बैठकीवेळी उपस्थित कामगार, सभासद व शेतकरी. |
दौलतचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील म्हणाले, ``न्युट्रीयन्सचे टेंडर
चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी मंजूर केले होते. त्यावेळी संचालक मंडळाला विश्वासात
घेतले नाही. न्युट्रीयन्स कंपनीची बॅलन्सशीट न बघता टेंडर पास केले आहे. मागील
सारखरेचे 8 कोटी रुपये येणे आहेत. दौलत ही तालुक्याची अस्मिता असल्यामुळे दौलत
सुरु व्हावा ही तालुक्यातील प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र आतापर्यंत आलेल्या
कंपन्यांनी शेतकऱ्यांना अडचणीत टाकले आहे. त्यामुळे पुढील हंगामाच्या प्रारंभीच्या
काळाता एक ते दिड महिना काटा पेमेंट करावे अशी सुचना केली.``
ॲड. संतोष मळविकर म्हणाले, ``दौलत कारखाना हा सभासद व
शेतकऱ्यांचा मालकीचा रहावा. यासाठी आजही चंदगडची जनता आग्रही आहे. याच भूमिकेने
आम्ही दौलतबाबत लढा देत आहोत. दौलतसाठी कामगार व शेतकऱ्यांनी मोठा त्याग केला आहे.
जनतेच्या दौलतवरील प्रेमामुळे वेळोवेळी आलेली संकटे मोठ्या धाडसाने दुर केली आहेत.
लोक मोठ्या आशेने अथर्व कंपनीकडे बघत असून त्यांचा विश्वास सार्थ ठरवावा.``
संग्राम कुपेकर म्हणाले, ``अथर्व कंपनीचे चेअरमन
मानसिंग खोराटे यांनी दौलत कारखाना चालवायला घेण्याबाबतचे धाडसी पाऊस उचलले आहे.
कारखाना बंद काळात ऊस अन्य ठिकाणी देताना काय अडचणींना तोंड द्यावे लागले हे
सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे चंदगडची दौलत पुन्हा सुरु करण्यासाठी चंदगड-आजरा-गडहिंग्लज
येथील उत्पादक शेतकरी कंपनीच्या पाठीशी राहील.`` प्रभाकर खांडेकर
म्हणाले, ``कंपनीने शेतकरी, कामगार व उत्पादक यांच्या हिताचा निर्णय
घ्यावा. कारखाना चालविण्याला अडचणी आल्यास चंदगडकर कंपनीच्या पाठीशी उभे राहतील,
अशी विश्वास व्यक्त केला.`` मष्णु सुतार म्हणाले, ``दौलत कारखाना बंद
पडल्यामुळे शेतकरी मरणप्राय यातना भोगत आहे. तालुक्यामध्ये कारखाना पुर्ण क्षमतेने
चालेले एवढी अनुकूल परिस्थिती असूनही कारखाना बंद पडला. याला अनेक कारणे आहेत.
कारखाना सुरु झाल्यानंतर लोकांचे आशिर्वाद मिळतील.`` यावेळी दौलतचे चेअरमन
अशोक जाधव, व्हा. चेअरमन संजय पाटील, मनोहर होसुरकर, नामदेव पाटील, प्रदिप पवार,
राजू पाऊसकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment