किणी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर व वह्या वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2019

किणी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर व वह्या वाटप

किणी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर व वह्या वाटप करण्यात आल्या. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी 
आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मराठी विद्या मंदिर ,किणी( ता. चंदगड ) येथे प्रगती तनिष्का महिला गटा मार्फत गरीब विद्यार्थ्यांना "रद्दीतून बुद्दीकडे" हा आगळा वेगळा कार्यक्रम गट प्रमुख  सौ,शीतल कुट्रे यांच्या अध्यक्षतेत पार पडला. गावातून गटाच्या महिलांनी रद्दी दान स्वरूपात घेऊन ती विकून आलेल्या पैशातून पहिली ते सातवी पर्यंतच्या गरीब विद्यार्थ्याना दप्तर व वह्या वाटप केल्या.
कार्यक्रमला  मुख्याद्यापक श्री.ए.के. पाटील विलास पाटील,सर्व शिक्षक , सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव श्री.एम.व्ही.पाटील तसेच तनिष्का गटाच्या सर्व महिला सदस्या उपस्तिथ होत्या,दान स्वरूपात रद्दी  दिलेले श्री.व्ही.आर.पाटील,कृष्णा साळुंके,दयानंद सलाम,हणमंत पाटील,सुनील गजरे ,बबन तरवाळ ,जोतलिंग कदम,संभाजी कुंभार,विठल नांदुडकर,पुंडलिक नौकुडकर,बंडू लोबो,दिगंबर हुंदळेवाडकर,प्रकाश नांदुडकर,  विष्णू गवंडी,मारुती गंवडी,  ,महावीर गणाचारी,संतान लोबो,अशोक हन्नूरकर,संजय  कुट्रे या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.


No comments:

Post a Comment