![]() |
चंदगड पोलिसांनी मौजे शिरगाव येथे छापा टाकून जप्त केलेली 13 लाख 44 हजार 768 रूपयांची गोवा बनावटीची दारु. |
मौजे शिरगाव (ता. चंदगड) येथे शेतातील घरात गोवा बनावटीची विविध कंपन्यांची 142 बाॅक्समधील 13 लाख 44 हजार 768 रूपयांची दारू चंदगड पोलिसांनी छापा टाकून जप्त केली.गावलगत शेतात असलेल्या घरांत विना परवाना विक्री करण्यासाठी गोवा बनावटीची दारू गोडावून मध्ये ठेवल्याची माहिती चंदगड पोलिसांना खब-याकरवी मिळाली .मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरिक्षक श्रीप्रसाद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस.आय. श्री. कदम, सहाय्यक फौजदार राजू पाटील, हवालदार कासेकर, महेश बाबंळे, दिपक पाचवडेकर, अमोल निकम, शैलेश शिंदे, अमोल देवकूळे, संतोष वडेकर यांनी छापा टाकला. यावेळी श्री. मुळीक
यांच्या शेतातील रहात्या घरात गोल्डन आईस व्हीस्की कंपनीचे 68 बॉक्स, त्यामध्ये 48
नग (किंमत 3 लाख 65 हजार 568), दुसऱ्या बॉक्समध्ये गोल्डन आईस व्हीस्की कंपनीचे 78
बॉक्स, त्यामध्ये 12 नग (किंमत 4 लाख 21 हजार 200), इम्पीरियल ब्ल्यु कंपनीचे 7 बॉक्स,
त्यामध्ये 12 नग (किंमत 63 हजार), रिझर्व्ह सेवेन कंपनीचे 75 बॉक्स, त्यामध्ये 12
नग (किंमत 4 लाख 95 हजार) असे पोलिसांनी जप्त केले. पोलिसांच्या कारवाईची कुणकुण
लागताच संशयित आरोपी तेथून फरार झाला.
No comments:
Post a Comment