चंदगड शहरात दुषित पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2019

चंदगड शहरात दुषित पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यातचंदगड / प्रतिनिधी
चंदगड शहरात पुरविण्यात येणारे नदीचे पाणी थेट पुरविण्यात येते असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या चोवीस तासात ग्रामीण रूग्णांलयात चारहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे चंदगड शहरातील नागरीकांनी पाणी पिण्याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
चंदगड ग्रामीण रुग्णांलयात दिवसेनदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. चंदगडला मुबलक प्रमाणात पाणी असुनही हे पाणी नागरिकांच्या जीवनाला हाणीकारक ठरत आहे. पाच कोटी रुपये खर्च करून कार्यान्वित केलेल्या पाणी योजनेत फील्टर बंद असल्याचे समजते. त्यामुळे थेट पाणी पुरवठा केला जात असल्याने दुषित पाणी पिऊन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे दुषित पाणी पिल्याने नागरीकांना त्रास झाल्याने काही रुग्ण चंदगड ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर काही रुग्ण पुढील उपचारासाठी बेळगावला गेल्याचे समजते. चंदगड शहराला सद्या घटप्रभा व ताम्रपर्णी नदीचे पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी शुद्ध केले जात नाही. कारण पाणी शुद्धीकरणासाठी असलेले फिल्टर बंद अवस्थेत आहे. त्यामुळे सध्या शहरात पुरवठा केले जाणारे पाणी अशुद्ध स्थितीत असल्याने हे पाणी नागरिकांच्या जीवाला हाणीकारक ठरत आहे. सध्या चोवीस तासात दुशीत पाण्यामुळे पोटदुखी व संडास, कावीळसारख्या त्रासामुळे चंदगड ग्रामीण रुग्णांलयात उचारासाठी रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील अनेक ठिकाणी केवळ नळाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागेल. अन्य पर्याय नाही त्यामुळे दुशीत पाणी नागरिकांना आजाराचे आमंत्रण ठरत आहे.No comments:

Post a Comment