चंदगड /
प्रतिनिधी
शिवाजी
विद्यापीठ कोल्हापूर व र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड यांच्या संयुक्त
विद्यमाने मंगळवारी (ता. 19) कै. एस. एन. पाटील सभागृहात सकाळी अकरा वाजता पदवीदान
कार्यक्रम आयोजित केल्याची माहीती प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी दिली. कार्यक्रमाला
जी. एस. एस. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या सौ. माधुरी शानबाग प्रमुख अतिथी
असतील. कागलच्या माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले प्रमुख उपस्थित
रहाणार आहेत. चंदगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी
असतील. या समारंभाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पदवीप्रदान समारंभ सचिव डॉ.
पी. एल. भादवणकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment