तेऊरवाडी / प्रतिनिधी
मौजे जेट्टेवाडी (ता. चंदगड) येथे अखंड हरिनाम सप्ताहाला शनिवार दि . 16 पासून सुरवात होणार आहे. याची मुहूर्त मेढ दत्तू पाटील यांच्या हस्ते उभे करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी कुद्रेमणीच्या जोतिबा पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन केले आहे . रविवारी नामदेव गोरल यांचे किर्तन होणार आहे . सोमवारी सकाळी कालाकिर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले असून दुपारी जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ होणार आहे. या तीन दिवसात प्रवर्चन, भजन, किर्तन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सप्ताह समितीने केले आहे.
No comments:
Post a Comment