कोवाड केंद्र शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत अभूतपूर्व यश - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2019

कोवाड केंद्र शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत अभूतपूर्व यश

कोवाड शाळेच्या प्रज्ञाशोध परीक्षेतील  यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शाळा समिती अध्यक्ष रामा यादव मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील वर्ग शिक्षक व शिक्षिका .
कालकुंद्री / प्रतिनिधी
किणी  येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) च्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले. केंद्रातील गुणानुक्रमे पहिल्या २५ विद्यार्थ्यांत कोवाड शाळेच्या १३ विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले .
या सर्व विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय परीक्षेसाठी निवड झाली आहे .शाळेतील प्राजक्ता विनायक कुंभार हिने १४८ गुणांसह केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. गुणानुक्रमे आलेले अन्य विद्यार्थी पुढीलप्रमाणे माऊली पुंडलिक दळवी , अर्जुन उत्तम वांद्रे , ईश्वरी गुरूपाद मेगेरी , अमन ज्योतिबा बिर्जे , प्रणव नारायण पाटील , अनुजा लक्ष्मण तोगलेकर , नम्रता लक्ष्मण घोरपडे , आर्यन अशोक पाटील , अनुष्का राहुल व्यवहारे, शिवम विनायक कुट्रे , जिया सोमारुप्रसाद वर्मा , प्रीती अनिल होन्याळकर या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक कविता अनंत पाटील व श्रीकांत आप्पाजी पाटील यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रोत्साहन लाभले . या कामी शाळेतील अध्यापिका लता सुरंगे उज्वला नेसरकर ,भावना अतवाडकर , मधुमती गावस यांचे सहकार्य लाभले .शाळेने यावर्षी सांस्कृतिक स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदासह क्रीडा स्पर्धेतील विविध प्रकारात देदीप्यमान कामगिरी केली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी सौ एस सुभेदार व विस्तर अधिकरी बीडचे विस्ताराधिकारी विलास कांबळे यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment