माजी आमदार महाडिक यांनी लोकसभेपूर्वी दिली हळदणकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2019

माजी आमदार महाडिक यांनी लोकसभेपूर्वी दिली हळदणकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी चंदगड येथे घेतली हळदणकर यांची सदिच्छा भेट.   
चंदगड / प्रतिनिधी
विधान परिषदेचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी चंदगड येथे माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर यांची सदिच्छा भेट घेतली. महादेवराव महाडिक 2008 मध्ये विधानपरिषद निवडणुकीसाठी निवडणुक रिंगणात होते. त्यावेळी सर्वप्रथम चंदगड येथील तत्कालीन जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर यांनी महाडिक यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. माजी आमदार श्री. महाडिक आज चंदगड येथे आले असता त्यांनी बाबुराव हळदणकर यांची भेट घेतली. येत्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही सदीच्छा भेट राजकीय द्रुष्ट्या चर्चेची झाली आहे. यावेळी माजी सरपंच अरुण पिळणकर, शेखर वाली, बाळु पाटील, संतोष हळदणकर, सुनिल हाळवणकर, प्रभाकर जुवेकर उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment