चौथ्या आधार स्तंभामुळे सैनिकांना बळ वाढते - माजी सैनिक गोविंद मासरणकर - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2019

चौथ्या आधार स्तंभामुळे सैनिकांना बळ वाढते - माजी सैनिक गोविंद मासरणकर

चंदगड येेथे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ओळखपत्र वितरण करताना माजी सैनिक गोविंद मासरणकर, शेजारी तालुकााध्यक्ष नंदकुमार ढेरे, उदयकुमार देशपांडे, अनिल धुपदाळे, श्रीकांत पाटील, संपत पाटील व इतर.
चंदगड / प्रतिनिधी
भारत हा एक विशिष्ट प्रकारच्या विविधतेने नटलेला देश म्हणून जगात ओळखला जातो. या देशाला एक वेगळी संस्कृती लाभली आहे. तीची जगभर ख्याती आहे. एकशेह तीस कोटी भारतीयाना सैन्याविषयी अभिमान आहे. सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ फार मोठे योगदान देत आहे,पत्रकारच आपल्या लेखनिच्या जोरावर जाग्रुती करत असतो .असे प्रतिपादन नुकताच चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हा रिपोर्टर असोसिएशनच्या ओळखपत्र वितरण कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहुणे माजी सुभेदार गोविंद मासरणकर यांनी केले.  अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार.संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे होते. प्रथम उपस्थितीत फत्रकारांचे स्वागत व प्रस्तावना संपर्क प्रमुख संतोष सुतार यांनी केली. त्यानंतर मासरणकर यांच्या हस्ते जिल्हा रिपोर्टर असोसिएशनची ओळखपत्रे वितरण करण्यात आली. यावेळी उदयकुमार देशपांडे,अनिल धुपदाळे,श्रीकांत पाटील, संपत पाटील, संजय पाटील, राजेंद्र शिवनगेकर, चेतन शेरेगार,राजु बोळके,सी.व्ही तारळी ,शाहनुर मुल्ला, ईत्यादी उपस्थित होते.आभार चेतन शेरेगार यांनी मानले.

No comments:

Post a Comment