हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याची धोकादायक स्थितीत असलेली स्वागत कमान. |
दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना हलकर्णी (ता. चंदगड) कार्यस्थळा पासुन एक किमी वर असणारी स्वागत कमान धोकादायक स्थितीत उभा आहे. मोडकळीस आलेली कमान पडून अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र या कमानीला वाली कोण असा प्रश्न लोकांतून विचारला जात आहे.
बेळगाव -वेगुंर्ला या मुख्य मार्गापासुन दौलत कारखाना हलकर्णी गावच्या रोडला एक किमी अंतरावर आहे. कारखाना कार्यस्थळावर प्रवेश करायचा असेल तर ह्या कमानीशिवाय दुसरा पर्याय नाही. कारखान्याची स्थापना झाल्यापासुन ही कमान मोठया दिमाखात उभी आहे. स्थापनेपासुन घडलेल्या सर्व घडामोडी या कमाणीने जवळुण पाहिल्या आहेत. दौलतला लागलेली उतरत्या कळेची झळ या कमाणीला लागली आहे. दौलत सुरु असताना प्रत्येक हगांमाच्या प्रारंभी या लोखंडी कमाणीला रंगरंगोटी केली जायची. पण गेली काही वर्ष दौलत बंद असल्याने या कमानीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कमान पुर्ण गंजुन कुमकुवत झाल्याने पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. दौलत चालवण्यासाठी अथर्व कंपनी लवकरच ताबा घेणार असल्याचे दिसते. त्यामुळे तालुक्यातील सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे मोडकळीस आलेल्या धोकादायक कमाणीला कामस्वरूपी ताठ मानेने उभा राहणेस अथर्व कंपणी सक्षम ठरेल का? ही चर्चा रंगत आहे.
No comments:
Post a Comment