चंदगड / प्रतिनिधी
हेरे (ता. चंदगड) येथील सह्याद्री विद्यालयात येथे कनिष्ठ महाविद्यालय सूरू करण्यास महाराष्ट्र सरकारच्या वतीने परवानगी दिल्याची माहिती मुख्याघ्यापक व्हि. एस. कार्वेकर यांनी दिली. हेरे येथे कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय सूरू करावे अशी अनेक वर्षे या भागातील पालक व विद्यार्थाची मागणी होती. संस्थेचे संचालक के. एस. मावळे, मूख्याघ्यापक व्हि. एस. कार्वेकर यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून रमेशराव रेडेकर, आमदार सुरेश हावळणकर यांच्या करवी सरकारकडे पाठवला होता. शिक्षणमंत्री विनोद तावडे यानी खास बाब म्हणून या ठिकाणी अकरावी, बारावीचे कला, वाणिज्य व विज्ञान वर्ग सुरू करण्यास येत्या शैक्षणिक वर्षापासून परवानगी दिली आहे. या कामी सचिव प्रा. आर. पी. पाटील, प्रा. एन. एस. पाटील, ज. गा. पाटील, एम. एम. तुपारे, शामराव मुरकुटे आदीचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment