सांगली येथे गुरुवारी पेन्शनरांचे जेल भरो आंदोलन, सहभागी होण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2019

सांगली येथे गुरुवारी पेन्शनरांचे जेल भरो आंदोलन, सहभागी होण्याचे आवाहन


चंदगड / प्रतिनिधी
सांगली येथे पेन्शनगरांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. 7) सांगली बस स्टँड जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून झुलेलाल चौक येथे रास्ता रोखो करून 'जेल भरो' करण्यात येणार आहे. या आंदोलनात पेन्शनरानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रमिक संघाच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनातून केले आहे. 
नुकतीच पुणे येथे महाराष्ट्र पेन्शन धारकांची सभा झाली. कोशियारी समिती प्रमाणे तीन हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता नाही दिला तर भाजपाला मत देणार नाही असा निर्धार करुन पत्रक छापून भाजपा विरोधात प्रचार करावा. पण काँग्रेसला पाठिंबा बाबत कोणताही ठराव केला नाही. यावेळी कोर्टाचा निर्णय व त्यानंतरची वाटचाल याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. मात्र भाजपा-शिवसेना सरकारच्या पेन्शन विरोधी धोरणाला तडाखा देण्यासाठी गुरुवार 7 मार्च रोजी सांगली बस स्टँड जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून झुलेलाल चौक येथे रास्ता रोखो करून 'जेल भरो' करण्यात येणार आहे. यावेळी काँ. दत्तात्रय अत्याळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी पेशनधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जानबा बोकडे, गोपाळ गावडे, वसंत गणाचारी, शांताराम पाटील, अम्रुत कोकीतकर, शिवाजी परिट, अशोक वनारे यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment