शिरोली येथे रविवारी रवळनाथ देवाची यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2019

शिरोली येथे रविवारी रवळनाथ देवाची यात्रा


चंदगड / प्रतिनिधी :-
शिरोली-सत्तेवाडी (ता.चंदगड) येथील ग्रामदैवत श्री रवळनाथ देवाची  वाषिॅक यात्रोत्सव  रविवार दि. 10 मार्च 2019 रोजी होणार  आहे. या निमित्त  रात्री 11.00 वाजता गावातील हौशी कलाकारानी कमलाकर बोरकर लिखीत तीन अंकी तमाशा प्रधान "डाकु मानसिंग"हा नाट्य प्रयोग सादर करणार आहेत. या नाटकाचे उद्धाटन मूबंई कामगार युनियनचे कोषाध्यक्ष शरद राघव यांच्या हस्ते होईल. सरपंच सौ. राजश्री तात्यासो देसाई यांच्या अध्यक्षस्थतेखाली कार्यक्रम होणार आहे. या नाटकाचा लाभ नाटयप्रेमीनी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment