![]() |
संग्रहित छायाचित्र |
माणगाव / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी येथील बेरड तळे येथील शेतातील गव्याकडून गेले चार दिवस ऊस, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ऐन काजूच्या बहारावेळी गवे आल्याने काजू बाग राखण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
![]() |
चंदगड वनविभागाच्या वतीने पंचनामे करताना वनपाल डी. एच. पाटील, बी. आर. भांडकोळी व नुकसान ग्रस्त शेतकरी वर्ग. |
ऐन काजूबाग राखण्याच्या हंगामात गव्यानी चंदगड तालुक्यात डुक्करवाडी येतील शेतकऱ्यांच्या बहरात आलेली ऊसाची लावणी, मका पिक व काजूच्या झाडांचे मोठे नुकसान केले आहे. गव्याच्या या धुमाकुळामुळे डुक्करवाडी येथील बेरडतळे शेतातील शिवाजी विठ्ठल पाटील यांच्या 3 एकर 20 गुंठे, विठ्ठल आप्पाजी यादव यांच्या 25 गुंठे, शिवाजी कृष्णा यादव व धोडींबा कृष्णा यदव यांच्या प्रत्येक 30 गुंठे तर परशराम सुभाण्णा यादव यांच्या 1 एकर 10 गुंठे ऊस क्षेत्र गव्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सध्या काजुबाग बहरात येत असल्याने काजू बी वेचण्याचा हंगाम सुरू असतानाही कोणीही शेतकरी गव्याचा धुमाकूळ पाहून शेताकडे जाण्यास तयार होत नाहीत. जिवाच्या भितीने शेतकरी शेती कसण्याचे सोडून देतो की काय अशी भिती व्यक्त होत आहे. आज दुपारी वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी. एच. पाटील, वनपाल बी. आर. भांडकोळी, वनरक्षक सी. पी. पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले. वन विभागाने गव्याना पिटाळून लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment