संभाजीराजेंच्या चंदगड झंझावती दौऱ्याने कार्यकर्ते चार्ज, दोन दिवसात 42 गावात दौरा - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2019

संभाजीराजेंच्या चंदगड झंझावती दौऱ्याने कार्यकर्ते चार्ज, दोन दिवसात 42 गावात दौरा

तावरेवाडी (ता. चंदगड) येथे कार्यकर्त्यांच्यासोबत खासदार छत्रपती संभाजीराजे.
संपत पाटील, चंदगड
खासदार छत्रपती संभाजीराजे गेले दोन दिवस चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. निमित्त होते, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार व जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी. यामुळे कार्यकर्ते झाले चार्ज. राजेंच्या या दौऱ्याचा फायदा शिवसेना भाजप युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी नक्कीच होणार आहे. 
चंदगड तालुक्यातील कलिवडे येथील धनगरवाड्यावरुन 20 वर्षापूर्वी आपल्या सामाजिक कार्याची सुरवात केली. कोणतेही सत्तास्थान नसताना त्याकाळी दर महिन्याला एक-दोन कार्यक्रम घेवून युवकांचे संघटन केले होते. तालुक्यातील बऱ्याच गावांत आज राजेंचे कार्यकर्ते आहेत. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजेचे जिल्ह्यातील आवडते ठिकाण म्हणजे चंदगड. अनेक वेळा याठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. 2009 साली संभाजीराजे यांनी लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आघाडी दिली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र चंदगडच्या कार्यकर्त्यांनी दिलेले मताधिक्य आजही लक्षात आहे. दरम्यान राष्ट्रपती नियुक्त खासदारकी संभाजीराजे यांना मिळाल्यानंतर खऱ्या अर्थ्याने राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. पुन्हा त्यांनी राजेंनी तालुक्यातील संपर्क वाढवला. केंद्रात भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्विकारल्यानंतर रायगड प्राधिकरणासाठी खासदार संभाजीराजे यांना 600 कोटी रुपयांचा निधी मिळाला. यावेळी त्यांची रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाली. या माध्यमातून रायगड व परिसरातील गावांचा विकास झपाट्याने होत आहे. त्याच धर्तीवर चंदगड तालुक्यातील पारगड, महिपाळगड, गंधर्वगड, कलानंदीगड या गड-किल्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 
कलिवडे (ता. चंदगड) येथे प्रचार करताना छत्रपती संभाजीराजे.
केद्रातून भागाचा विकास करण्यासाठी निधी मिळवायचा असेल केंद्रात भाजपचीच सत्ता असायली हवी. या उद्देशाने त्यांनी गेले दोन दिवस या दोन दिवासांत त्यांनी अडकूर, शिरोली, कानूर खुर्द, चंदगड, हंबेरे, नांदवडे, पाटणे, आंबेवाडी, कलिवडे, मजरे कार्वे, तावरेवाडी, हलकर्णी फाटा, डुक्करवाडी, शिवनगे, किणी, कोवाड, कालकुंद्री या प्रमुख गावांसह तालुक्यातील 42 गावांचा प्रचार दौरा करुन गावातील जुन्या-कार्यकर्त्यांना आपली भूमिका पटवून दिली. त्याचसोबत भाजपा व शिवसेना युतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचार दौऱ्यात संजय पवार, नंदकुमार ढेरे, संतोष सुतार, दिवाकर पाटील, महादेव गुरव, सुनिल काणेकर, सुधीर देशपांडे, चंद्रकांत दाणी, प्रविण वाटंगी, सचिन नेसरीकर, प्रविण नेसरीकर, नितीन नेसरीकर, सुनिल पाटील, नारायण गडकरी, विलास कागणकर आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
                                           कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था दुर...............
कोल्हापूर येथे झालेल्या मेळाव्यामध्ये भाजपचे सर्व नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र संभाजीराजे नव्हते. त्यामुळे राजेप्रेमींच्यामध्ये त्यांची भूमिका काय याबाबत कार्यकर्त्यांच्यामध्ये काहीशी संग्रभामावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी हा संभ्रम दुर करण्यासाठी चंदगड तालुक्याचा दोन दिवसाचा दौरा करुन कार्यकर्त्याशी संवाद साधून आपली भूमिक स्पष्ट केली. यावेळी 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या जखमा अजूनही ओल्या असल्याची भावना कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केली. त्याचबरोबर भाजप व शिवसेनेचे युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना मतदान कऱण्याचे आवाहन केले. 
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे हांजओहोळ येथे नदीत तरुणांच्यासोबत पोहण्याचा आनंद लुटताना छत्रपती संभाजीराजे.
               संभाजीराजेंनी लुटला नदीत पोहण्याचा आनंद..............
खासदार संभाजीराजे दोन दिवसांच्या चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते कर्यात भागात कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेत फिरत होते. ढोलगरवाडी गावानजीक आल्यानंतर बंधाऱ्यावरुन त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना त्यांना नदीत पोहणारे तरुण पाहिले. डोक्यावर तापत असलेले ऊन्हामुळे त्यांना पोहण्याचा नदीत पोहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. सुरक्षा रक्षकांनी पोहण्याची मनाई करुनही त्यांनी कपडे काढून पाण्यात सुर मारली. त्यामुळे राजेंच्या सोबत अन्य तरुणांनीही नदीत पोहण्याचा आनंद लुटला. ते आपले राजेपण विसरुन सामान्य माणसांत एकरुप होऊन गेले.

No comments:

Post a Comment