![]() |
आकाशात पडलेल्या इंद्रधनुष्यच्या मनमोहक अशा छटा. कोवाड (ता. चंदगड) येथे हे छायाचित्र टिपले आहे आमचे छायाचित्रकार व वृक्षप्रेमी संजय पाटील (दर्पण फोटो) कोवाड. |
चंदगड शहरासह तालुक्यात आज ठिकठिकाणी वळीव पावसाने हजेरी लावली. दुपारी चारच्या दरम्यान विजेचा कडकडाट व गारासह सुमारे तासभर पाऊस झाला. उष्म्याने हैराण झालेल्या नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
![]() |
चंदगड शहरात गारासह पडलेला मुसळधार पाऊस |
आज सकाळपासून हवेत कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी तीनच्या दरम्यान काहीकाळ ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे उष्म्याच्या प्रमाणात अधिकच वाढ झाली. सायंकाळी चारच्या दरम्यान सुसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. काही क्षणात गारासह पावसाला सुरवात झाली. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्यांना वाहनधारकांना पावसात भिजतच मार्गक्रमण करावे लागले. हा पाऊस ऊस, मिरची, भुईमूग, मका यासह अन्य पिकांना उपयुक्त ठरला आहे. सुसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत वाहीनीवर पडल्यामुळे सुमारे तीन तास विजपुरवठा खंडीत झाला होता. चंदगडसह शिरगाव, नागनवाडी, हिंडगाव, वाळकुळी, हलकर्णी, माणगाव, शिवनगे, दाटे, नांदवडे यासह तालुक्याच्या अन्य ठिकाणी वळीव पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे विहिरीच्या पाणीपातळीत काहीशी वाढ होणार आहे.
इंद्रधनुष्यच्या मनमोहक अशा छटा पहा
No comments:
Post a Comment