तेऊरवाडी कुस्ती आखाड्यात कोल्हापूरचे पै. उदयराजची बेळगावच्या पै़.पवनवर घिस्सा डावावर मात - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2019

तेऊरवाडी कुस्ती आखाड्यात कोल्हापूरचे पै. उदयराजची बेळगावच्या पै़.पवनवर घिस्सा डावावर मात

तेऊरवाडी येथे आयोजित कुस्ती आख्याड्यातील प्रथम क्रमांकाच्या लढतीचा एक क्षण
तेऊरवाडी / प्रतिनिधी
रामनवमिनिमित्य ब्रम्हदेव तालिम आखाडा तेऊरवाडी (ता. चंदगड) यांच्या वतीने आयोजित केलेल्या कुस्ती  आखाडा कोल्हापूरच्या मल्लांनी गाजवला . प्रथम कमांकाच्या लढतीमध्ये कोल्हापूर मोतिबाग तालमीचा मल्ल उदयराज पाटील याने बेळगावचा मल्ल पवन याच्यावर घिस्सा डावावर चितपट करून विजय संपादन केला.
या कुस्ती आखाडयासाठी खासदार धनंजय महाडीक, जि. प. सदस्य कल्लापा भोगण, प्रा. गुरूनाथ पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. आखाड्यातील विजयी मल्ल अनुक्रमे असे - पै. निरपती (दडी) , शिवानंद (बेळगाव), शुभम पाटील (कोल्हापूर), वैभव पाटील (कोल्हापूर), विठ्ठल (तुर्केवाडी), बबन (कंग्राळी) , इंद्रजित (कोल्हापूर), सागर (कोवाड), गणेश, पुंडलिक (शिनोळी), दर्शन (कंग्राळी), कामेश (कंग्राळी), आकाश (कोडोली), सुरज दाटे  यांच्यासह पन्नासहून अधिक कुस्त्या या मैदानात झाल्या. पंच म्हणून प्रकाश दळवी, महादेव पाटील, राजाराम पाटील आदिनी काम पाहिले. धावते समालोचन  एम. ए. पाटील व एन. व्ही. पाटील यांनी केले. आखाडा यशस्वी होण्यासाठी राजेंद्र भिंगुडे, महादेव पाटील, रवी पाटील, सुबराव पाटील आदिनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment