हेमरस कारखान्याच्या वतीने पुणे येथे आयोजित प्रशिक्षणावेळी उपस्थित महिला व अधिकारी. |
चंदगड / प्रतिनिधी
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) ॲग्रो साखर कारखाना व सॉलिडेअरीडॅड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी व्हीएसआय पुणे मांजरी येथे 100 महिलांसाठी 3 दिवसांचे निवासी प्रशिक्षण व अभ्यास दौरा घेण्यात आल्याची माहीती ओलम (हेमरस) ॲग्रोचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली.
या दौऱ्यामध्ये प्रशिक्षणार्थाना ऊस उत्पादनासाठी व वाढीसाठी येणाऱ्या संपूर्ण खर्चासह तज्ञ शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. आतापर्यंत कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील चंदगड, गडहिंग्लज व आजरा भागातील 700 महीला व 700 पुरुषांनी अशा एकूण 1400 शेतकऱ्यांना या अभ्यास दौऱ्याचा लाभ घेतल्याचे सांगितले. 2018-19 मधील ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण एफ. आर. पी. नुसार होणारे ऊस बिल प्रती मे. टन 2920/- प्रमाणे अदा करुन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असल्याचेही सांगण्यात त्यांनी आले. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन वाढविण्यासाठी वेळोवेळी कारखान्यच्या माध्यमातून ऊस तज्ञ मार्गदर्शकाकडून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगितले. यासाठी मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांचे व त्यांचे फिल्ड ऑफिसर यांच्या सहकार्याचे प्रत्यक्ष बांधावरचे कार्यक्रम राबविले जातात. या उपक्रमामुळे दिवसेनदिवस शेतकऱ्यांचा ओलमवरील विश्वास दृढ होत आहे.
No comments:
Post a Comment