![]() |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यी. |
माणगाव / प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती चंदगड तालुक्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
तालुक्यातील डुक्करवाडी येथे सिद्धार्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्यावतीने रथयात्रेचं आयोजन करण्यात आले होते. प्रज्ञा, शील, करुणा यांचा आदर बाळगत महामानवाला मानवंदना देवून आदरांजली अर्पण करण्यात आली. डुक्करवाडी विद्यालयाचे ज्येष्ठ अद्यापपक प्रमोद मधाळे यांच्या हस्ते आज प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस. एम. कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. मराठी विद्यामंदीर लाकुरवाडी येथे मुख्याध्यापक पी. जे. पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी अध्यापक रमेश कांबळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी राहुल आंबुरे, सुनिता साळुंके यांच्यासह शाळा व्यवस्थापनचे सर्व सदस्य उपस्थित होते. मराठी विद्या मंदीर डुक्करवाडी येथे कल्लाप्पा अमिनभावी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विठ्ठल पिटूक, राजेंद्र सुतार, सुरेखा चिंचणगी तर बसर्गे येथील भावेश्वरी विद्यालयत मुख्याध्यापिका सौ. सुषमा जानबा पाटील यांनी प्रतिमापूजन केले.
No comments:
Post a Comment