हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे घटप्रभा नदीवर पोहण्याऱ्या मुलांची असलेली गर्दी. |
संजय पाटील / तेऊरवाडी
सध्या तापमानात दिवसेनदिवस प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे. मुश्कील होत आहे. सद्या सर्वत्र सकाळच्या सत्रात शाळा सुरु आहेत. त्यामुळे वाढलेल्या उष्म्यामुळे मुले भर उन्हात दुपारच्या वेळी थंडावा मिळविण्यासाठी नदीपात्रामध्ये पोहोयला जाताना दिसत आहे. यामुळे पोहायलाही शिकत येतो. त्याचबरोबर गर्दीपासून सुटकाही मिळते. त्यामुळे मुलांची संख्या दिवसेनदिवस वाढत असल्याने एखादा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे दक्षता घेण्याचीही गरज आहे.
या वर्षाचा उन्हाळा नागरिकांना असह्य बनला आहे. प्रति महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या चंदगडमध्येही प्रचंड प्रमाणात गर्दी जाणवत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी बालचमूनी आपला मोर्चा आंघोळीसाठी नदीकडे वळवला आहे. त्यामुळे सध्या तरी विहीरी व नदिवर बालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. चंदगड तालुका नैसर्गिकदृष्टया पाणी व झाडांनी समृद्ध आहे. सर्वत्र हिरवळ असूनही तापमानात प्रचंड वाढ होत आहे. आजचे कमाल तापमान 35 डिग्री सेल्सीअस होते. यामुळे प्रचंड उष्मा जाणवत आहे. सकाळच्या सत्रात शाळा, कॉलेज चालू असल्याने दुपारच्या वेळी ही मुले अंघोळीसाठी ताम्रपर्णी व घटप्रभा नदीघाटावर व गावाशेजारी असलेल्या विहिरीच्यावर मोठी गर्दी करत आहेत. चंदगड तालुक्यात लहान-मोठे पंचवीसहून अधिक प्रकल्प असल्यामुळे नद्यानाही बारमाही पाणी असते. नद्यांना बांध घालून पाणी अडविलेल्या ठिकाणी शांत व स्वच्छ पाणी पोहणाऱ्यांना भुरळ घालत आहे. पोहताना विशेष काळजी न घेतल्यास पोहणे मुलांच्यासाठी धोकादायक ठरू शतते. त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाणी बघुन पोहण्याचा मोह मोह जरी आवरत नसला तरीही मुलांनी मोठ्या समवेतच पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेण्याची आवश्यकता आहे. सध्या मात्र दुपारच्या सत्रात नद्या हाऊसफूल आहेत.
1 comment:
Kadak
Post a Comment