कोवाड / प्रतिनिधी
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम ॲग्रो इंडिया प्रा. लि. (हेमरस) यांचे वतीने किणी (ता. चंदगड़) येथे 4 एप्रिल 2019 रोजी दु 3 वाजता हुमनी प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन केले आहे. किणी येथील प्रयोगशील शेतकरी संजय कुट्रे यांच्या ' मळवी ' नावाच्या शेतमधील नदीकाठावरील प्लॉटमध्ये कृषि महाविद्यालय कोल्हापुरचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग मोहिते यांचे हुमनी बंदोबस्त या बाबत मार्गदर्शन होणार आहे. सर्व शेतकरी बांधवानी उपस्थित राहुन या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील व नामदेव पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment