गुढीपाडव्याला दौलतवर अभिषेक घालून कामकाजास सुरुवात, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2019

गुढीपाडव्याला दौलतवर अभिषेक घालून कामकाजास सुरुवात, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

दौलतचे संग्रहित छायाचित्र
मजरे कार्वे / प्रतिनिधी
गेली सहा-सात वर्षे बंद अवस्थेत असलेला दौलत साखर कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अथर्व शुगर्स प्रा लि. चे संचालक मानसिंग खोराटे यांनी केडीसीसी बँकेचा हप्ता 20 कोटी 87 लाख रुपये जमा केल्याने चंदगड तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे डोळे दौलत कडे लागून राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11 वाजता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखर कारखाना परिसरातील गणेश मंदिरात अभिषेक व पूजा घालून कारखान्याच्या कामकाजास सुरुवात करण्याचे धोरण अथर्व कंपनीने निश्चित केले आहे. त्यामुळे कारखान्याचे कामगार शेतकरी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अभिषेक व पूजेला कारखान्याचे कामगार, हंगामी कामगार, शेतकरी, सभासद व दौलतचे हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन दौलत कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पोवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment