तेऊरवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून केला चार किलोमीटरचा रस्ता - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2019

तेऊरवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून केला चार किलोमीटरचा रस्ता

तेऊरवाडी येथे श्रमदानातून रस्त्याच्या कामात मग्न असलेले ग्रामस्थ.

तेऊरवाडी / प्रतिनिधी
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे एकीच्या व श्रमदानाच्या जोरावर ग्रामस्थांनी  तीन  लाख रुपये स्वखर्चाने चार किलोमीटर बीचे दोन रस्ते पूर्ण केले.
'शासनाचे काम आणि कित्येक वर्षे थांब' असे असल्याने सर्वच बाबतीत शासनावर अवलंबून न राहता ग्रामस्थांनीच ग्रामपंचायतीच्या सहकार्याने स्व-खर्चाने शेताकडे जाणारे रस्ते पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी एकत्र येवून पाचशे पासून दोन हजार रुपयापर्यंत वर्गणी काढली. जेसीबी, ट्रॅक्टर व हजारो हातांचे श्रमदान करून दोन-दोन किलोमीटर अंतराचे गावापासून पश्चिमेला जक्कनहट्टी गावच्या दिशेला जाणारे दोन रस्ते पुर्ण करुन वाहतुकीला योग्य बनविले. ज्या रस्त्यावरून उन्हाळ्यात चालत जाणे अवघड होते त्या रस्त्यावरून आता वाहने धावणार आहेत. शेतीसाठी वाहणे ने-आण करणे सोपे होणार आहे. यासाठी या शेतकऱ्यांना तेऊरवाडी ग्रामपंचायतीने मोलाचे सहकार्य केले. एकंदरीत लोकांच्या सहभागातून रस्ते पूर्ण करण्यात आले असले तरी त्या रस्त्यांच्या मजबूती करणासाठी शासनाने निधी दिल्यास रस्ते कायमचे पक्के होतील अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


No comments:

Post a Comment