तेऊरवाडी येथे बेवारस अल्टो कार, पोलीसांनी दखल घेण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2019

तेऊरवाडी येथे बेवारस अल्टो कार, पोलीसांनी दखल घेण्याची गरज

तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे बेवारस स्थितीत रस्त्याकडेला उभी असलेली मारूती सुझुकी अल्टो कार.
तेऊरवाडी / प्रतिनिधी
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे कोवाड मार्गावर गेल्या महिन्याभरापासू  MH-24, C, 3718 या  नंबरची बेवारस  स्थितीतील मारूती अल्टो कार रस्त्याकडेला उभी आहे. कोवाड पोलीसांनी याची दखल घेऊन या कारमालकाचा शोध घेणे गरजेचे आहे. गेल्या महिन्यात  रात्रीच्या वेळी ही कार गाडी रस्त्याकडेला पार्किंग केलेली आढळून आली आहे. गाडीच्या सर्व काचा बंद करून गाडी लॉक करण्यात आली आहे. सिल्वर रंगाची गाडी असून पुढील नंबर प्लेट अर्धवट तर पाठीमागील पुर्ण आहे. एखाद्या ग्रामस्थाची किंवा पाहुण्याची गाडी असेल म्हणून दुर्लक्ष करण्यात आले. पण महिना झाला तरी ती गाडी तेथेच असल्यामुळे हि गाडी कोणाची याविषयी चर्चा सुरु आहे. शेजाऱ्यांना सुद्धा या गाडीची काहीही कल्पना नाही.  कोवाड पोलीसांनी या गाडीच्या मालकाचा शोध घ्यावा व चर्चेला पूर्णविराम द्यावा अशी मागणी होत आहे. 

No comments:

Post a Comment