चंदगड येथे पारंपारीक पध्दतीने रंगपंचमी उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2019

चंदगड येथे पारंपारीक पध्दतीने रंगपंचमी उत्साहात साजरी

चंदगड येथे रंगपंचमीचा आनंद घेताना बच्चे कंपनी.
चंदगड / प्रतिनिधी
तालुक्यातील चंदगड येथे पारंपारीक पध्दतीने रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला. सोंगे काढण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आज दुपारपर्यंत वाघ्या-मुरळीच्या सोंगानंतर सोंगाची सांगता झाली.
गेले काही दिवस तालुक्यातील बहुतःश गावात वाघ्या-मुरलीबाहुबलीगौळणनवरा-नवरीराम-लक्ष्मणआंधळाभजन यासह विविध विषयावरील सोंगे काढण्यात आली. होळीमध्ये सोंगे काढणे पारंपारिक असली तरी दिवसागणित यातील तरुणांचा सहभाग कमी-कमी होत आहे. तालुक्यातील काही भागात धुलवंदनादिवशी रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. बहुतःश भागात आज गुडीपाडव्याच्या अगोदरच्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात आली. चंदगड शहरामध्ये पाडव्याच्या अगोदरच्या दिवशी रंगपंचमीचा रिवाज असल्याने तेथे याच दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. काल रात्रभर सोंगे काढून जागर करण्याची प्रथा चंदगड शहरामध्ये आहे. बालचमू रंगपंचमी असल्यामुळे आज सकाळपासूनच रंग घेवून एकमेकांना रंगवत होते. सकाळी काही प्रमाणात तर दुपारनंतर गावातील तरुणलहान-मोठी मंडळी रंगामध्ये रंगून गेली होती. रंगून घरी आलेली घरातील व्यक्तींही घरच्यांना ओळखीला सापडत नव्हती अशीच काहीशी स्थिती होती. यामध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.


No comments:

Post a Comment