![]() |
के. डी. सी. सी. बँकेचे अधिकारी अथर्व इंटरट्रेड कंपनीला दौलतच्या गेटचे कुलूप काढून ताबा देताना. |
मजरे कार्वे / प्रतिनिधी
गेल्या सहा-सात वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या दौलत सहकारी साखर कारखान्याचा रीतसर ताबा अथर्व इंटर ट्रेड प्रा लि कडे देण्यात आला. केडीसीसी बँकेच्या ताब्यात असलेला कारखाना पंचनामा करून प्रवेश द्वार उघडून बँकेच्या अधिकाऱ्यांनी अथर्व कडे सुपूर्द केला. यावेळी उपस्थित कामगार, केडीसीसीचे अधिकारी, अथर्व अधिकारी, दौलतचे संचालक मंडळ यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
दौलत साखर कारखान्याची मालमत्ता सिक्यूटीरायझेशन अॅक्ट 2002 अन्वये जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाने 25 मार्च 2012 रोजी बँकेने ताब्यात घेतली होती. कारखाना पुन्हा चालविण्यासाठी वेळोवेळी जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. 2016 ला पुन्हा जाहिरात प्रसिद्ध केली व गोकाक च्या न्युट्रियंस कंपनीने दौलत कारखाना चालविण्यास घेतला. न्युट्रियंस कंपनीने दिलेल्या मुदतीत बँकेची रक्कम न भरल्याने केडीसीसी बँकेच्या 29 डिसेंबर 2018 च्या मीटिंगमध्ये कंपनी सोबतचा करार रद्द करण्यात आला. पुन्हा 4 फेब्रुवारी 2019 रोजी टेंडर काढण्यात आले. अथर्व इंटरंंट्रेड व चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाने टेंडर भरली. अथर्व इंटरंंट्रेड ने 39 वर्षासाठी व चंदगड तालुका संघाने 40 वर्षासाठी कारखाना चालवावयास द्यावा असे टेंडर भरले होते. त्यामुळे अथर्व इंटरंंट्रेड ला संचालक मंडळाने कारखाना चालविण्यास दिला. त्याचा करार होऊन कंपनीने 25 टक्के रक्कम मार्चअखेर व 25 टक्के रक्कम सप्टेंबरअखेर भरण्याचे कबूल केले. त्यापैकी 16 कोटी 81 लाख 89 हजार रुपये पहिला हप्ता अथर्व कंपनीने बँकेत भरला आहे.
![]() |
दौलत कारखान्याचा अथर्व कंपनीकडे रितसर कागदोपत्री ताबा देत असताना. |
त्यामुळे बँकेने रीतसर कारखान्याचा ताबा अथर्व कंपनीकडे दिला यावेळी केेडीसीसी बँकेचे प्राधिकृत अधिकारी विकास जगताप, व्यवस्थापक आर जे पाटील, उपव्यवस्थापक आर ए पाटील, एस आर ओ मंगेश ललित, एस ए कारंजकर, आय ए सनदी, मोहन बागल, विभागीय अधिकारी बीबी पाटील, जयवंत पाटील, जयवंत कुंभार, अशोक खराडे यांनी अथर्व कंपनीचे वित्त व्यवस्थापक उत्तम तानूगडे त्यांच्याकडे दौलत चा रीतसर ताबा दिला. यावेळी दौलत उद्योग समूहाचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, चेअरमन अशोक जाधव, व्हा चेअरमन संजय पाटील, विशाल पाटील, मनोहर होसुरकर, निंगाप्पा आवडणं, मारुती तूर्केवाडकर, तुकाराम मुळीक, शिवाजी हसबे, प्रदीप पवार, राजू पावसकर, अनिल होडगे, सुधाकर पवार, सुरेश भातखांडे, दिलीप कदम यांचेसह कामगार व शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment