चंदगड तालुक्यात गुडीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी प्रवेशोत्सव साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2019

चंदगड तालुक्यात गुडीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी प्रवेशोत्सव साजरा

बेळेभाट (ता. चंदगड) येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवावेळी त्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली.

माणगाव / प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जाणीपूर्वक गेल्या काही वर्षापासून गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडवा प्रवेश वाढवा हा उपक्रम राबवून इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानाची गुढी उभा करून विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरातील वातावरण मंत्रमुग्ध वाटेल व  विद्यार्थी शाळेत रमतील असे उपक्रम आजच्या दिवशी राबवण्यात आले.
प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करून मोफत पाठ्यपुस्तके ,गणवेश, शालेय पोषण आहार योजना यासारख्या  विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना शाळांमध्ये राबवतात येत आहेत .गुढीपाडव्याच्या दिवशी शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा. शाळेसमोर ज्ञानाची गुडी उभी करावी व इयत्ता  पहिलीत दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत आमंत्रित करावे त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. दाखल पात्र विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून  पालकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व  शाळेच्या वैभवशाली परंपरा याची माहिती द्यावी. आणि इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विद्यार्थी प्रवेश करून घ्यावा असे नियोजन आज करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी या विविध उपक्रमांचे आयोजन आज सकाळी करण्यात आले होते . चंदगड तालुक्यातील बेळेभाट येथील उपक्रमशील शाळेतील विद्यार्थ्यांची  खास रथातून मिरवणूक काढून वाजत गाजत शाळेमध्ये आणले .यावेळी माध्यमिक उप शिक्षणाधिकारी बी.डी.टोणपे यांनी उपस्थित राहून कौतुक केले यावेळी  बहुसंख्य पालक ,आजी माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य  यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
लाकुरवाडी (ता. चंदगड) येथे प्रवेशोत्सवावेळी जमलेले पहिलीतील विद्यार्थ्यी.
तालुक्यातील सर्वच शाळेमध्ये आज हा उपक्रम राबवण्यात आला.पटसंख्या वाढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा मार्फत शाळेच्या वतीने प्रभात फेरी घर भेटी आदी उपक्रम राबविण्यात संबंधित शाळांना शिक्षण विभागाच्या वतीने सुचना करण्यात आल्या होत्या.100% पटनोंदणी व जादा पटनोंदणी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान ही या उपक्रमातून करण्यात येतो. शाळेचा पहिलीचा वर्ग विविध संकल्पना चित्र ,कार्टून्स वर्ग, वर्ग स्मार्ट बनवून गुढीपाडव्याच्या दिवशी शाळांमध्ये होणारा प्रवेशाची माहिती जिल्हा परिषदेला सादर करण्याच्या सूचना आहे शाळेला करण्यात आल्या होत्या.

No comments:

Post a Comment