सातवणे येथे दोन दुकाने फोडून 13 हजारांचा माल लंपास तर माणगाव येथे चंदनाच्या झाडाची चोरी - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2019

सातवणे येथे दोन दुकाने फोडून 13 हजारांचा माल लंपास तर माणगाव येथे चंदनाच्या झाडाची चोरी

सातवणे येथे चोरट्यानी सिमेंटचा दरवाजा  तोडून दुकानात प्रवेश केला .
अडकूर / प्रतिनिधी
चंदगड - नेसरी राज्य  मार्गावर असणाऱ्या सातवणे ( ता. चंदगड ) येथे अज्ञात चोरटयानी मध्यरात्री दोन दुकाने फोडून तेरा हजारांचा माल लंपास केला . तर माणगाव येथील  भावकू सुतार यांच्या घराशेजारील चंदनाचे झाड चोरटयांनी लंपास केले.
सातवणे बस स्टॉपवर चाहाची दोन हॉटेल्स व काजू व्यापाऱ्याचे दुकान आहे . मध्यरात्री चोरट्यानी पांडूरंग रूक्माना कोंडूसकर यांच्या दूकानामध्ये प्रवेशद्वाराचे कुलूप तोडुन दुकानात प्रवेश केला. या दुकानातील 70  किलो काजू  बिया व गल्यातील एक हजार रुपये असा माल लंपास केला. तर शेजारी असणाऱ्या अमर तुकाराम कोंडुसकर यांच्या हॉटेलचा पाठीमागील सिमेंट दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. येथील 1800 रुपये किमतीचा एक टेबल फॅन व 1500 रुपये किमतीचा होम थिअटर चोरला. दोन्ही ठिकाणी मिळून जवळपास तेरा हजारांचा माल लंपास करण्यात आला. या संदर्भातील तक्रार विठ्ठल पांडूरंग कोंडूसकर यांनी चंदगड पोलिसात दिली  आहे.
माणगाव येथे चोरट्यांनी बुंदयातून तोडून नेलेले चंदनाचे झाड
दुसऱ्या एका घटनेत माणगाव (ता  चंदगड) येथे भावकू सूतार यांच्या घराशेजारी असणारे चंदनाचे झाड मध्यरात्री चोरट्यानी लंपास केले .भावकू सुतार यांच्या घराला लागूनच चंदनाची मोठे झाड होते . मध्यरात्री चंदन चोरट्यानी हे झाडच कापून लंपास केले. उभे झाड चोरिला गेल्याचे सकाळी लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली . घर फोडणाऱ्या टोळीबरोबरच चंदगड तालूक्यात चंदन चोरणारी टोळीही सक्रीय झाली आहे. या घरफोडी बरोबरच चंदन चोरांचाही बंदोबस्त करणे गरजेचे आहे. वनविभाग व चंदगड पोलिस सक्रीय झाले तरच या चोरींचा छडा लागू शकतो.




No comments:

Post a Comment