![]() |
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय. |
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती समिती यांच्याकडून 14 व 15 मे 2019 रोजी मुल्यांकन करण्यात आले. त्यासंबंधीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून महाविद्यालयाला बी++ हे मानांकन मिळून 2.79 इतका सी. जी. पी. ए. प्राप्त झाला. याबद्दल महाविद्यालयाचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी ``आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. एम. एम. माने सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा असल्याची भावना व्यक्त केली. शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी आजी माजी विद्यार्थी पालक यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. कै. र. भा. माडखोलकर यांच्या नावाने सुरू झालेल्या या महाविद्यालयाचा लौकीक दिवसेंदिवस वाढतच राहील. कै. माडखोलकर यांनी ज्या तत्वांनी व उद्देशाने हे महाविद्यालय सुरू केले आहे. तीच तत्वे व उद्देश पुढे नेऊ असा मानस प्राचार्य डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. मूल्यांकन समितीमध्ये जम्मू काश्मीर येथील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मुश्ताक सिद्दिकी, हरियाणा येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी व पॉडेचेरी येथील प्राध्यापक श्री. पी. नटराजन यांचा समावेश होता. शिवाजी विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण भागातील प्लस प्लस मानांकन मिळणारे महाविद्यालय म्हणून समाजात प्रशंसा होत आहे.
No comments:
Post a Comment