हलकर्णी येथे माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातून दौलतला गतवैभव मिळण्याची कामना - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2019

हलकर्णी येथे माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातून दौलतला गतवैभव मिळण्याची कामना

कोवाड : हलकर्णी येथील माध्यमिक विद्यालयातील स्नेहमेळाव्यात सहभागी झालेले माजी विद्यार्थी.
कोवाड / प्रतिनिधी
दौलत कारखान्याच्या परिसरात आम्ही शिक्षणाचे धडे गिरविले. तिथचं आम्ही लहानाचे मोठे झालो. पण आमच्या शैक्षणिक जीवनातील साक्षीदार असलेल्या दौलतची भग्न अवस्था पाहून मन सुन्न झालं. अशी खंत व्यक्त करून दौलत कारखाना लवकर सुरु व्हावा, अशी भावना स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यानी व्यक्त केली. 
हलकर्णि ( ता. चंदगड ) येथील माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९६-९७च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा झाला. २२ वर्षानंतर विद्यार्थी एकत्र आले होते. शालेय जीवनातील आठवणी सांगताना अनेक विद्यार्थ्यांनी दौलत सुरु व्हावा, अशी भावना व्यक्त केली. शाळेच्या प्रगतीसाठी आपले नेहमी सहकार्य राहील, असा विद्यार्थ्यानी निर्धार केला. स्वागत विनायक पाटील यांनी केले. रामू नाईक व धोंडीबा लासे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दत्ता जाधव, विजय पाटील, संदीप पाटील, संध्या कुराडे, शुभांगी काटे, अर्चना घाडगे, सुजाता रेडेकर , वर्षा पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. एस.व्ही. पाटील, सुधीर फडके, एस.एस. इंजलकर, के.बी. नाईक, बी.बी. नाईक, धनाजी पाटील, आर.के. पाटील, नाकाडी सर यांचा विद्यार्थ्यानी सत्कार केला. बसवराज रामपुरे यांनी सुत्रसंचालन केले. विशाल कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment