तुर्केवाडी फाटा येथे काजूला नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2019

तुर्केवाडी फाटा येथे काजूला नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन

तुर्केवाडी फाटा (ता. चंदगड) काजूला नुकसान भरपाई मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जेलभरो आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रभाकर खांडेकर, सुनिल शिंत्रे, संग्राम कुपेकर यांच्यासह कार्यकर्यांना अटक करताना पोलिस.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात प्रामुख्याने ऊसानंतर शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळवून देणाऱ्या काजूचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे उत्पादक व कारखानदार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे काजूला नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी तुर्केवाडी फाटा (ता. चंदगड) येथे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करुन सुटका केली. 
तुर्केवाडी फाटा (ता. चंदगड) येथे काजुला नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करताना. 
चंदगड तालुक्यात काजूची दरवर्षी 500 कोटी रुपयांची उलाढाल होते. काजूवर प्रक्रिया करणारे लहान-मोठे 207  प्रकल्प आहेत. गेल्या वर्षी काजूला दर प्रतिकिलो 175 रुपये होता. यावर्षी काजूचे उत्पादनाबरोबर दरही वर्षीपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. चंदगड तालुक्यात प्रक्रिया करणारे उद्योग व शेतकरी अडचणीत आले आहेत. केंद्र व महाराष्ट्र सरकारने  चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाकरिता अनुदान व प्रत्येक झाडाला एक हजार रुपये अनुदान द्यावे. प्रत्येक झाडाला महाराष्ट्र शासनाने एक हजार रुपये अनुदान द्यावे, काजुला हमीभाव मिळावा, काजु प्रकल्प उद्योजकांचे गेल्या तीन वर्षाचे व्याज माफ करावे, जीएसटी माफ करावा, काजू कामगारांना किमान वेतन मिळावे, यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, संघटक संग्राम कुपेकर, सहसंपर्क प्रमुख सुनिल शिंत्रे यांची भाषणे झाली. यावेळी अशोक मनवाडकर, सौ. संज्योती मळविकर, सौ. शांता जाधव, प्रताप पाटील, कलाप्पा नेवगिरी, अवधुत पाटील, नारायण भाटे, किरण कोकीतकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment