![]() |
कालकुंद्री कुळदेव यात्रेनिमित्त एकाच ताटात जेवणारे सात पाटील घराण्यातील चौदा प्रतिनिधी . |
कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील एकतेचे प्रतीक मानली जाणारी कुळ देवाची त्रैवार्षिक रविवार १९ मे रोजी उत्साहात संपन्न झाली. कालकुंद्री येथील यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सात पाटलांच्या सात घराण्यातील प्रत्येकी दोन प्रतिनिधी असे चौदा जण एकाच ताटात जेवतात . गावातील एकोपा राहावा तो वृद्धिंगत व्हावा यासाठी पूर्वजांनी घालून दिलेल्या नियमांची सुमारे एक हजार वर्षांची परंपरा इतिहास आहे. ती आजही कायम आहे. गावातील मूळ गोपाळ गावडे, साळू गावडे,निंगाप गावडे .जैनगावडे, भिकापगावडे , बाळुजगावडे, ओमान गावडे, ही सात घराणी आहेत .
कालकुंद्री येथील नव्वद वर्षांची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री कलमेश्वर चा अखंड नामसप्ताह महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण आहे. तद्वत शेकडो वर्षांची परंपरा असलेली कुळ देवाची यात्रा ही वैशिष्ट्यपूर्ण आहे . कुळ यात्रेनिमित्त सातेरी परसू पाटील व कुटुंबीयांनी पूजन केले. तर हक्कदार पाटील जयराम भरमू पाटील यांनी गार्हाणे घातल्यानंतर सात पाटील घराण्यातील शिवाजी पांडुरंग पाटील, विठोबा निळकंठ पाटील, मारुती शंकर पाटील, बंडू वसंत पाटील, मनोहर रामू पाटील, शिवाजी सुबराव पाटील, नरसु परशुराम पाटील, तुकाराम परशराम पाटील , लक्ष्मण पाटील, सुरेश मरगुणी पाटील ,शिवाजी खिरू पाटील ,कृष्णा आप्पाजी पाटील, अभिजित सुभाष पाटील, शशिकांत महादेव पाटील या चौदा प्रतिनिधींनी एकाच ताटात जेवण केले. परंपरेनुसार गावातील कोकितकर तसेच वरपे घराण्यातील मंडळीनी स्वयंपाक करणे वाढण्याचे कार्य केले.
यात्रेनिमित्त शेकडो भाविकांनी देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा अपूर्व उत्साहात संपन्न झाली .
No comments:
Post a Comment