चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील काजू पिक अत्यल्प असल्याने ऊस व काजू पिकाच्या आशेवर असणाऱ्या तमाम शेतकऱ्यांना काजू पिकाच्या अत्यल्प उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव हळदणकर यांच्या नेतृत्वाखाली नुकताच चंदगड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, `चंदगड तालुक्यातील शेतकरी ऊस उत्पादनाबरोबर काजू पिकाचेही ऊत्पादन घेतो. ऊसाच्या ऊत्पादनापेक्षा ब-याच शेतकऱ्यांनी काजूची लागवड करण्यासाठी भर दिला आहे. चालु हंगामात ऊस पिकाने दगा दिला. त्यामुळे शेतकरी काजु पिकावर आशा ठेवून होता. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी काजु ऊत्पादकांच्या आशेवर पाणी पडलेआहे. ऊस व काजुच्या नुकसानीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तालुक्यातील 70 ते 80 कोटी रुपया ईतके होणारे ऊत्पादन या हंगामात जेमतेम पाच -सहा कोटी रुपये सुध्दा होणार नसल्याचे चित्र आहे. ऊस व काजु पिकांच्या ऊत्पादनावर आशा ठेवून शेतकरी बँक व ईतर ठिकाणी जाऊन कर्ज घेऊन सण,समारंभ. लग्न कार्य घर बांधकाम ईत्यादी करतात. पण या हंगामात काजु पिक मोठ्या प्रमाणात घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक बाबतीत शेतक-यासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काजू बागांची पाहणी व पंचनामे करून लवकरात लवकर शासनाने संमधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारे निवेदन चंदगड तहसीलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनावर मा.जि.प.सदस्य बाबुराव हळदणकर,प.स.माजी सभापती जगन्नाथ हुलजी सिकंदर मुल्ला, सतार नाईक, अशोक पाटील,आक्रम मुल्ला, आब्दुलरहिमाण नेहरीकर,राहुल धुपदाळे,बाबु नेहरीकर, असलम मुल्ला, यशवंत पाटील सह्या आहेत.
No comments:
Post a Comment