नांदवडे येथे रविवारपासून श्री माऊली देवी मंदिर वास्तुशांत, मुर्ती प्रतिष्ठापणा व कळसारोहण सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2019

नांदवडे येथे रविवारपासून श्री माऊली देवी मंदिर वास्तुशांत, मुर्ती प्रतिष्ठापणा व कळसारोहण सोहळा

नांदवडे (ता. चंदगड) येेथील ग्रामदैवत श्री माऊली देवीचे मंदिर.
चंदगड / प्रतिनिधी
नांदवडे (ता. चंदगड) येथील श्री माऊली देवी, भावेश्वरी, बारावस, म्हारतळ मंदिर वास्तुशांत, मुर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा रविवारी (ता. 12) ते गुरुवार (ता. 16) या कालावधीत होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मंगळवारी 7 मे 2019 रोजी मुहुर्तमेढ रोवण्यात आली. रविवारी (ता. 12) देवदेवतांना आवाहन, मुर्ती व कळस मिरवणुक, विणा पुजन व धान्यदिवस यासह दिंडी मिरवणुक होणार आहे. सोमवारी (ता. 13) गणेश पुजन, पुण्याहवाचन, मातृकापुजन, नांदिश्राध्द, प्रासाद शुध्दी, अग्नी स्थापना, वास्तुशांत, गोमाता पुजन, कुमारीका पुजन, जलाधिवास यासह भजन, किर्तन, प्रवचन होईल. मंगळवार (ता. 14) प्रसादशुध्दी, देवतांचे पूजन, पर्याय होम, शिखर कळस होम, शिखर कळस पुजन होईल. बुधवारी (ता. 15) देवतांचे पुजन, तत्वज्ञास होम, देवतांची स्थापना, प्राणप्रतिस्थापना, कळासारोहन सोहळा व आशिर्वचन यासह कळसारोहण मुर्ती स्थापना असे कार्यकम होतील. गुरुवारी (ता. 16) सकाळी दिंडी सोहळा, गंगापुजन व मंदिर उद्घाटन महाआरती, गाऱ्हाणा व महाप्रसाद होईल. शेवटच्या दिवशी शेवाळे, पाटणे, जेलुगडे, पार्ले, कळसगादे, कोदाळी, मोटणवाडी, गुडवळे, खामदळे, हेरे, सुळये, आसगांव, नागनवाडी, कोनेवाडी, कोरज, कुर्तनवाडी, बेळेभाट, दाटे, हल्लारवाडी, हलकर्णी, सदावरवाडी, आंबेवाडी, करंजगांव, शिप्पूर, खालसा कोळींद्रे, खालसा सावर्डे, कलिवडे, किटवडे, जंगमहट्टी, गंधर्वगड, केरवडे, जट्टेवाडी व गुडेवाडी येथील दिड्यां सहभागी होणार आहेत. यासाठीची तयारी आतापासूनच गावात सुरु असून चार दिवसांचे उत्तम नियोजन केलेले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment