चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. ऋतुजा पाटील, स्नेहल पाटील, स्नेहा उपाध्ये, स्वप्नाली पाटील, अंजली पाटील (सर्व बी. एस. सी. भाग- एक) यांना प्रत्येकी 5000 रुपये तर तेजस्विनी कांबळे (बी. ए. भाग -दोन) व माधुरी बागवे (बी. ए. भाग -1) यांना प्रत्येकी 10,000 रुपये मिळाले. या या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीचे कौतुक होत आहे. संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, विशाल पाटील, प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment