कालकुंद्री ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या एक प्रभागासाठी पुन्हा 27 ला मतदान, 28 ला निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2019

कालकुंद्री ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या एक प्रभागासाठी पुन्हा 27 ला मतदान, 28 ला निकाल

ईव्हीएम मशीन (संग्रहित छायाचित्र)
चंदगड / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाच्या सात जागासाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी (ता. 24) तहसिल कार्यालयात निकाल होता. मात्र कालकुंद्री ग्रापंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये नोंदवही व एव्हीएम मशीन यामधील एव्हीएम मशीनमध्ये 15 मते अधिक झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत प्रभाग एकमधील उमेदवार विनायक धोंडीबा पाटील यांनी यावर आक्षेप घेत निवडणुक निर्णय अधिकारी एस. आर. दाणवाडकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार हि तक्रार संबंधिक स्थानिक यंत्रणेमार्फत निवडणुक आयोगाकडे पाठविण्यातत आली. निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार या प्रभागातील तीन जागांसाठी निवडणुक पुन्हा 27 जून 2019 रोजी घ्यावी. तोपर्यंत संपुर्ण उमेदवारांचा निकाल राखून ठेवावा व 28 जून 2019 रोजी सर्व उमेदवारांचा निकाल जाहीर करावा अशा निर्णय दिला आहे. त्यामुळे कालकुंद्री पोटनिवडणुकीसाठी केवळ प्रभाग क्रमांक एकसाठी पुन्हा नव्याने 27 ला मतदान घेतले जाणार आहे. 
कालकुंद्री ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी पोटनिवडणुक लागली होती. नऊ पैकी दोन जागा नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असल्याने त्या बिनविरोध झाल्या. कलमेश्वर ग्राम विकास आघाडीचे प्रभाग तीन मधून गीता शिवाजी नाईक व प्रभाग चार मधून लक्ष्मी पुंडलिक नाईक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत सात जागासाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबिवण्यात आली. यावेळी प्रभाग क्रमांक एकमध्ये मतदान सुरु असताना एव्हीएम मशीन बंद पडली. त्यामुळे मतदान केंद्रावरील अतिरिक्त असलेली एव्हीएम मशीन लावण्यात आली. यावेळी बंद पडलेल्या एव्हीएम मशीनमधील मतदान व कर्मचाऱ्यांच्या नोंदवहीतील मतदानामध्ये 15 मतांचा फरक आढळून आला. याबाबत उमेदवार विनायक पाटील यांनी आक्षेप घेतला होता. या आक्षेपानुसार हि तक्रार संबंधिक स्थानिक यंत्रणेमार्फत निवडणुक आयोगाकडे पाठविण्यात आली. त्यानुसार 27 जूनला पुन्हा केवळ प्रभाग क्रमांक एकमधील तीन जागांसाठी निवडणुक घेण्याचे ठरले. त्यामुळे संपुर्ण सात जागांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. 28 ला संपुर्ण सात जागांचा निकाल जाहीर होणार आहे. शिवशाही आघाडी विरुद्ध कलमेश्वर ग्राम विकास आघाडीमध्ये झालेल्या निवडणुकीसाठी चुरशीने काल रविवारी ७२ टक्के मतदान झाले. एकूण अकरा पैकी नऊ सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे नऊ जागांवर पोटनिवडणूक लागली होती. यातील दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरीत सात जागांसाठी रविवारी मतदान झाले होते.  

No comments:

Post a Comment