![]() |
कालकुंद्री ग्रामपंचायत पोट निवडणूक साठी मतदारांत असा उत्साह होता. |
कालकुंद्री( प्रतिनिधी)
कालकुंद्री ता. चंदगड येथील ग्रामपंचायत पोट निवडणुकीत सात जागांसाठी शिवशाही आघाडी विरुद्ध कलमेश्वर ग्राम विकास आघाडीत चुरशीने ७२ टक्के मतदान झाले. एकूण अकरा पैकी नऊ सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे नऊ जागांवर पोटनिवडणूक लागली होती. यात कलमेश्वर ग्राम विकास आघाडीचे प्रभाग 3 मधून संगीता शिवाजी नाईक व प्रभाग चार मधून लक्ष्मी पुंडलिक नाईक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सात जागांसाठी प्रभाग एक मधून मागास प्रवर्गातील सुरेश सट्टूपा नाईक विरुद्ध हनुमंत रमेश नाईक, सर्वसाधारण पुरुष - पांडुरंग गायकवाड ,विनायक धोंडीबा पाटील ,संभाजी राणबा पाटील यांच्यात तर सर्वसाधारण स्त्री साठी संगीता कल्लाप्पा पाटील व उज्वला मारुती सावंत यांच्यात लढत होत आहे. प्रभाग दोन मधून सर्वसाधारण पुरुष साठी विनायक पुंडलिक कांबळे विरुद्ध प्रकाश कल्लाप्पा पाटील , प्रभाग 3 मधून सर्वसाधारण पुरुष शंकर रामा कोकितकर ,नागेंद्र पुंडलिक पाटील ,ईश्वर लक्ष्मण वरपे यांच्यात तर सर्वसाधारण स्त्रीसाठी अनिता अनिल तेऊवाडकर विरुद्ध नम्रता परशुराम पाटील व प्रभाग चार मधून उमा शंकर मुर्डेकर विरुद्ध पूजा गुरुनाथ पाटील हे एकूण १६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. एकूण २६०४ पैकी १८७५ मतदारांनी आपला हक्क बजावला.
पंचवार्षिक निवडणुकीसाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहील्याने नेहमीपेक्षा मतदानाचा टक्का कमी राहिला. कोणताही राजकीय पक्ष,गट न पाहता स्थानिक आघाड्या झाल्या. मात्र मतदानावेळी झालेल्या चुरशी मुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment