चंदगड / प्रतिनिधी
राज्य शासनामार्फत फेब्रुवारी 2019मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत मजरे कारवे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालयाच्या आदित्य विश्वास पाटील (राज्य शिष्यवृत्तीधारक), शुभम रविंद्र पाटील (जिल्हा शिष्यवृत्तीधारक) या दोन विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. या विद्यालयातील एकूण 28 विद्यार्थी पात्र झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एल. जी. पाटील, एस. व्ही. गुरबे , एस. वाय. कुंभार, एल. व्ही. सुरुतकर, एम. एम. गावडे, एस. जे. मोहनगेकर, एस. जी. वरपे, के. बी. चांदेकर इतर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment