हलकर्णी / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र तुर्केवाडी (पाटणे फाटा) येथे प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहीती प्राचार्य एस. डी. देवधर यांनी दिली. या प्रशिक्षण संस्थेत विजतंत्री २०, जोडारी २०, पंप ऑपरेटर मेकॅनिकल २०, सधांता २०, ड्रेस मेकींग २० जागा दहावी पास विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी उपलब्ध आहेत. ३० जुन २०१९ पुर्वी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राचार्य देवधर यांनी केले आहे. इयत्ता दहावी व बारावी पास प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने आपला प्रवेश अर्ज रजिस्टर करायचा आहे. त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधुन पुढील कागदपत्रांची पुर्तता करायची आहे. अधिक माहीतीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment