कोवाडच्या कल्लाप्पा भोगण यांना राजर्षी शाहू पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2019

कोवाडच्या कल्लाप्पा भोगण यांना राजर्षी शाहू पुरस्कार

कल्लाप्पा भोगण
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील जिल्हा परिषदेचे सदस्य व धडाडीचे नेते कल्लाप्पा सत्तुराम भोगण यांना सन 2018- 19 या वर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री. भोगण यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेले निःस्वार्थी कार्य,  किणी कर्यात भागात विकासाची गंगा आणण्यासाठी केलेली धडपड, चंदगडवाशीयांचे अनेक प्रश्न वेळोवेळी जिल्हा परिषदेत मांडून त्यांचे केलेले निवारण. या त्यांनी केलेल्या निःस्वाथी कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री. भोगण यांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

No comments:

Post a Comment