कोवाड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आदम मुल्ला यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2019

कोवाड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आदम मुल्ला यांची निवड

आदम मुल्ला
कालकुंद्री / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीसाठी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत आदम दस्तगीर मुल्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य संजय पांडुरंग कुंभार हे शासकीय सेवेत रुजू झाल्यामुळे  त्यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला होता.  रिक्त झालेल्या या पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. इतर मागास पुरुष प्रवर्गासाठी राखीव जागेवर राजाराम कुंभार, चंद्रकांत सुतार, शिवाजी तेली व आदम मुल्ला हे चौघे इच्छुक उमेदवार होते. तथापि तंटामुक्त कमिटी कोवाड यांच्या वतीने ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले. यावेळी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत चिठ्ठ्या टाकून विजयी उमेदवार निवडण्याचे  निश्चित झाले. यात आदम मुल्ला भाग्यवान ठरले. निवड प्रसंगी  तंटामुक्त कमिटी सदस्यांसह सरपंच सौ. अनिता भोगण, उपसरपंच विष्णू आडाव, जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर, मारुती भोगण, एम. एन. पाटील, रणजित भातकांडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment