कोवाड येथे शिवसेनेच्या वतीने शेतकरी पिक विमा मदत केंद्राचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2019

कोवाड येथे शिवसेनेच्या वतीने शेतकरी पिक विमा मदत केंद्राचा शुभारंभ

कोवाड येथे शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र उद्घाटन प्रसंगी विजय देवणे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खंडेकर, सुनील शिंत्रे, अशोक मनवाडकर आदी शिवसेना पदाधिकारी
कालकुंद्री / प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जातात. तथापि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यापर्यंत या योजना पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे ओळखून शिवसेनेच्या वतीने कोवाड (ता. चंदगड) येथे शेतकरी मदत केंद्र स्थापन करण्यात आले. याचा शुभारंभ जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. या मदत केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने केले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी व मोठ्या गावात अशी मदत केंद्रे सुरू करण्याचा आदेश जिल्हा प्रमुखांना देण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा शिवसेनेच्या वतीने चंदगड व कोवाड या ठिकाणी मदत केंद्रे सुरू करण्यात आले. कोवाड येथील नवीन पुलासमोर मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. मदत केंद्राचे उद्घाटन जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, संग्राम कुपेकर, संभाजी पाटील, अशोक मनवाडकर, अनिल दळवी, सौ. संज्योती मळवीकर, सौ. शांता जाधव, श्वेता नाईक या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी दत्ता पाटील, किरण कोकितकर, रणजीत भातकांडे, परशराम मुरकुटे, मारुती पाटील ,कल्लाप्पा आवटी, मनोहर वांद्रे, मारुती भातकांडे, विनायक भोगण, विश्वनाथ वांद्रे, बाबू बिरजे, ज्योतिबा व्हन्हाळकर, विशाल पाटील, निरंजन चौगुले, विश्वनाथ बिरजे आदी कोवाड परिसरातील शिवसेना कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment