कालकुंद्री ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या एक प्रभागाचे 69.15 टक्के मतदान - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2019

कालकुंद्री ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या एक प्रभागाचे 69.15 टक्के मतदान


कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाच्या सात जागासाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी (ता. 24) तहसिल कार्यालयात निकाल होता. मात्र पोटनिवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये नोंदवही व एव्हीएम मशीन यामधील एव्हीएम मशीनमध्ये 15 मते अधिक झाल्याचे प्रभाग एकमधील मतदान आज पुन्हा घेण्यात आले. यामध्ये 239 पुरुष तर 261 स्त्रियां असे एकूण 500 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या (ता. 28) तहसिल कार्यालयात संपुर्ण सातही जागांचा निकाल जाहीर होणार आहे. 
रविवारी (ता. 24) रोजी सात जागासाठी मतदान झाले. यावेळी प्रभाग क्रमांक एकधील एव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे तात्काळ बिघाड झालेली एव्हीएम मशीन बदलण्यात आली. मात्र पोटनिवडणुकीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये नोंदवही व एव्हीएम मशीन यामधील एव्हीएम मशीनमध्ये 15 मते अधिक झाले. याबाबत प्रभाग एकमधील उमेदवार विनायक धोंडीबा पाटील यांनी यावर आक्षेप घेत निवडणुक निर्णय अधिकारी एस. आर. दाणवाडकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार हि तक्रार संबंधिक स्थानिक यंत्रणेमार्फत निवडणुक आयोगाकडे पाठविण्यात आली. निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार या प्रभागातील तीन जागांसाठी निवडणुक पुन्हा 27 जून 2019 रोजी घ्यावी. तोपर्यंत संपुर्ण उमेदवारांचा निकाल राखून ठेवावा व 28 जून 2019 रोजी सर्व उमेदवारांचा निकाल जाहीर करावा अशा निर्णय दिला आहे. त्यामुळे कालकुंद्री पोटनिवडणुकीसाठी केवळ प्रभाग क्रमांक एकसाठी पुन्हा नव्याने आज मतदान घेण्यात आले. मतदान शांततेत पार पडले.

No comments:

Post a Comment