शासकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी व गुरुवारी मुख्यालयात हजर रहावे - आमदार कुपेकर - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2019

शासकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी व गुरुवारी मुख्यालयात हजर रहावे - आमदार कुपेकर

आमदार संध्यादेवी कुपेकर
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दर सोमवारी व गुरुवारी मुख्यालयात हजर राहावे व नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी आमदार कुपेकर यांनी केली आहे.  याबाबत तहसीलदार विनोद रणावरे यांना पत्र पाठवले आहे. चंदगड तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे राजगोळी, तुडये, कानूर, कोदाळी या भागातील लोकांना चंदगड तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी आल्यास त्यांचा दिवस वाया जातो, पैसा व वेळही खर्च होते. याचा त्रास तालुक्यातील नागरीकांना होत आहे. त्यामुळे तालुक्यातील वन, कृषी, पाणी पुरवठा, भुमिअभिलेख, महसुल तसेच इतर खात्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी सोमवारी व गुरुवारी मुख्यालयातच उपस्थित राहावे. याबाबत सर्वांना सक्त सुचना द्याव्यात अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे तहसीलदार श्री. रणावरे यांच्याकडे आमदार श्रीमती कुपेकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment