काजू उत्पादकांना भरपाई व उद्योगालाही सवलती मिळाव्यात – सदस्य दयानंद काणेकर यांची पं. स. सभेत मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2019

काजू उत्पादकांना भरपाई व उद्योगालाही सवलती मिळाव्यात – सदस्य दयानंद काणेकर यांची पं. स. सभेत मागणी

चंदगड पंचायत समिती इमारत
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात ऊसानंतर काजूचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र यावर्षी काजूचे उत्पादन घटल्याने उत्पादक शेतकरी व कारखानदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व काजू उद्योगाला उद्योगाप्रमाणे सवलत द्याव्यात. जीएसटीमध्ये सवलत मिळावी अन्यथा कारखाना बंद होवून यावर अवलंबून असलेले कामगारांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याने सरकारी मदत द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर यांनी केली. पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांनी ही मागणी केली. अध्यक्षस्थानी सभापती बबनराव देसाई होते.
प्रारंभी गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांनी प्रास्ताविक केले. चंदगड येथील पंचायत समितीच्या सभागृहात 19 तारखेला काजू लागवडीची नवीन पद्धत व संगोपन संदर्भात तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेमध्ये नवीन जातीच्या काजू अभियानाविषयी तसेच काजूचे उत्पादन वाढीसाठी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी आर बी जोशी यांनी दिली. तालुक्यात महावितरणकडे घरगुती 125, शेतीपंपाची 31 कनेक्शनना जोडणी दिली आहे. सोलार पंपासाठी 20 अर्ज आले असून त्यापैकी आठ अर्ज मंजूर केले आहे. तसेचन आठ अर्जना कोटेशन दिल्याची माहिती अभियंता एमएस लोधी यांनी दिली. भोगोलीसह तालुक्यातील प्रत्येक गावात गंजलेले खांब असून यासंदर्भात महावितरण सर्वे करत नाही का? असा सवाल सदस्य ॲड. आनंद कांबळे यांनी उपस्थित केला असता अभियंता एम. एस. लोधी यांनी गंजलेल्या खांबांचा गावावर सर्वे करून त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले.चंदगड तालुक्यामध्ये शाश्वत पाणी पुरवठा होण्यासाठी तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार करून त्यासंदर्भात योग्य ती कागदपत्रे जोडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून देऊ. यासाठी एकोणीस तारखेला चंदगड येथे सरपंच ग्रामसेवक व पाणी पुरवठा विभाग यांची संयुक्त बैठक बोलाल्याची माहिती गट विकास अधिकारी जोशी यांनी दिली.
पं. स. मासिक सभेत पाणी पुरवठ्याबाबत माहीती देताना उपअभियंता एस. ए. सावळगी
चंदगड-हिंडगाव मार्गवर चंदगडजवळील नाल्यावर बांधलेल्या मोरीवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकीस्वार घसरून पडत आहेत याकडे सदस्य दयानंद काणेकर यांनी लक्ष वेधले असता असता चिखल व इतर घाण काढण्यासंदर्भात बांधकाम विभागाला सूचना दिल्याची माहिती गटविकास अधिकारी जोशी यांनी दिली. चंदगड तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत ते तीस कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत सव्वादोन लाख वृक्षांची लागवड होणार आहे सोनारवाडी ते रस्त्याच्या दुतर्फा 1000 अंब्रोलीते मुगळी दोन किलोमीटर 1000 शिरोली फाटा ते अडकूर दोन किलोमीटर एक हजार रुपये याशिवाय अडोरे पाच हेक्टर हेक्टर ॲक्टर नांदवडे होसुर 5 फॅक्टर नागरदळे सेक्टर से एकूण तालुक्यातील 70 हेक्‍टर क्षेत्रावर एक लाख 52 हजार 500 रोपांची लागवड करण्यात येणार आहे शिवाय तालुक्यातील तांबुळवाडी येथे 130000 तांबडी येथील रोपवाटिकेत 130000 तर भौगोलिक येथे चार लाख रोपांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती सामाजिक वनीकरण चे वनक्षेत्रपाल भोसले यांनी दिली.
ग्रामीण रुग्णांलयात स्वच्छताच नसते, याबाबत सदस्य काणेकर यांनी लक्ष वेधले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. साने स्वच्छतेचा ठेका एका कंपनीला दिला असून त्या कंपनीचे माणसे स्वच्छता करण्याचे काम करत असल्याचे सांगितले. तालुक्यात 1000 पुरुषांमागे 889 एवढे स्त्रियांचे प्रमाण कानूर आरोग्य केंद्राच्या परिसरात दर एक हजार पुरुषांमागे 1033 एवढे स्त्रियांचे प्रमाण आहे. राज्यात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तालुक्यात सर्प व श्वानदंश च्या लसी सर्वत्र उपलब्ध असल्याचे असल्याची माहिती विजय पाटील यांनी दिली. यावेळी बैठकीला मनीषा शिवनगेकर नंदिनी पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. आभार सदस्य जगन्नाथ यांनी मानले.




No comments:

Post a Comment