चंदगड तालुक्यात दिवसभर पावसाच्या हलक्या सरी, वातावरणात कमालीचा गारवा - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2019

चंदगड तालुक्यात दिवसभर पावसाच्या हलक्या सरी, वातावरणात कमालीचा गारवा

चंदगडमध्ये दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. 
चंदगड / प्रतिनिधी
आज सकाळपासून शहर परिसरात दिवसभर राहून-राहून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा जाणवत होता. गेले दोन दिवस चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी धुळवाफ पेरणीच्या कामात गुंतले आहे. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर एकच गर्दी होताना दिसत आहे.
सकाळपासून ढगाळ वातावरणासोबत पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी धांदल उडाली होती. त्यामुळे शिवार माणसांनी फुलून गेले होते. बैलजोडी व ट्रक्टरने नांगरणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्यामध्ये चढाओढ दिसत होती. चंदगड तालुका म्हणजे भरपूर पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो मात्र दशकापासून पावसाचे प्रमाण खूपच कमी झालेआहे. यावेळी जूनच्या दुसरा आठवडा होत आला आहे तरी पण पावसाचा पत्ता नव्हता. पावसाच्या लहरीपणाचा अनुभव तालुक्यातील तमाम शेतकरीवर्गाने यापूर्वीही घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकरी वर्गाने पावसाच्या सुरूवातीचा अभ्यास करून पेरण्या करण्याचा विचार केला. त्यामुळे आता पावसाचा काहीशी सुरूवात झालेल्या शेतकरी वर्गाने पेरणीच्या कामासाठी लगबगीनं तयारी केली आहे. लागणरी साधन-सामुग्रीची जमवाजवळ करताना बळीराजा दिसत आहेत. 

तिलारीनगर जवळ कागल आगाराची बस मातीत घसरली.
तालुक्यात ठिका-ठिकाणी महानेटसेवेच्या कामासाठी रस्त्याच्या बाजुला चर खोदले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. पावसाळ्यात रस्त्याकडेला असलेली चर मुजवली असली तरी पावसाचे पाणी गेल्याने जीवघेणी ठरत आहे. चर खोदलेली ठिकाणे या पावसाळ्यात धोकादायक ठरणारआहेत.  आज  तिलारीनगर जवळ कागल आगाराची बस दुसऱ्या वाहनाला साईट देताना चरात गेली. त्यामुळे अडकून पडली. त्यामुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत बसावे लागले. 


No comments:

Post a Comment