मांडेदुर्गच्या रामचंद्र पवार यांची आशियाई व जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2019

मांडेदुर्गच्या रामचंद्र पवार यांची आशियाई व जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

रामचंद्र पवार
चंदगड / प्रतिनिधी
मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील रामचंद्र मारूती पवार यांची भारतीय ज्युनिअर  महिला कुस्ती टिमचा प्रशिक्षक म्हणून भारतीय कुस्ती महासंघ ने निवड केली आहे. स्पोर्टस् ऑथारटी ऑफ इंडियाच्या लखनऊ येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये 3 जून ते 14 आॅगस्ट दरम्यान प्रशिक्षण शिबिर सुरु आहे.
यामधुन निवडलेला संघ 09 ते 14 जुलै दरम्यान थायलंड येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धा व 12 ते 18 आॅगस्ट दरम्यान इस्टोनिया (युरोप) येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्ती संघाचे कोच म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. याआधी त्यांनी युवा औलंपिक स्पर्धा 2018 (अर्जेटिना) त्याच बरोबरच अनेक आशियाई व जागतिक कुस्ती स्पर्धा मध्ये कोच म्हणून यशस्वी कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे देशाचा तिरंगा कुस्ती क्षेत्रात जगात फडकवला आहे. आपल्या  चंदगड तालुक्यात सुध्दा क्रीडा क्रांती व्हावी व आपल्याही तालुक्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्य व देशाचे नाव उज्वल करावे. यासाठी त्यांचे वडिल मारूती नाना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व बंधु लक्ष्मण पवार यांच्या सहकार्याने मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम सुरु आहे. त्यांच्या निवडीबद्दल  चंदगड तालुक्यातील सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment