चोरीच्या प्रकाराबाबत युवा सेनेचे विभागीय उपअधिक्षकाना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2019

चोरीच्या प्रकाराबाबत युवा सेनेचे विभागीय उपअधिक्षकाना निवेदन

गडहिंग्लज उपविभागात चोऱ्याचे प्रमाण वाढले असून चोराचा बंदोबस्त करावा. या मागणीचे निवेदन देताना युवा सेनेचे पदाधिकाी.
गडहिंग्लज / प्रतिनिधी
गडहिग्लज  उप-विभागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. गडहिंग्लज तालुक्यातील सावतवाडी तर्फ नेसरी,उंबरवाडी,हलकर्णी,या सह आजरा तालुक्यातील लाकुडवाडी इत्यादी ठिकाणी चोऱ्याचे प्रकार घडले आहेत त्यामुळे लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वाढत्या चोऱ्यांचा बंदोबस्त करण्याकरीता आपण आपल्या कार्यक्षेत्रातील गडहिंग्लज,आजरा,चंदगड व नेसरी येथील पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन सदर प्रकारांना आळा घालणेसाठी प्रयत्न करावेत यासाठी शिवसेनेच्या वतीने नुकताच  पोलीस अधिक्षक (गडहिंग्लज विभाग) अनिल कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. सुनिल शिंत्रे
(सहसंपर्क प्रमुख चंदगड विधानसभा), दिलीप माने शिवसेना तालुका प्रमुख गड, अवधुत पाटील युवासेना तालुका प्रमुख गड,सागर कुराडे शहर प्रमुख ,अशोक शिंदे शहर प्रमुख,वसंत नाईक उपतालुका प्रमुख, भारत जाधव उपतालुका प्रमुख,संजय पाटील उपतालुका प्रमुख,काशीनाथ गडकरी उपशहर प्रमुख,बाबुराव नाईक युवासेना तालुका समन्वयक,सागर हेब्बाळे युवासेना उपशहर प्रमुख,प्रकाश सासुलकर,व शिवसैनिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment