केंद्र शाळा कोवाड येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2019

केंद्र शाळा कोवाड येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

केंद्र शाळा कोवाड येथे नवीन दाखल विद्यार्थ्यांचे स्वागत करताना मान्यवर व शिक्षक
कोवाड / प्रतिनिधी
केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच आनिता भोगण होत्या.
जगासमोर आदर्श माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ भोगण व ग्राम सदस्या भारती कोरी यांच्या हस्ते झाले. प्रस्ताविक  मुख्याध्यापक श्रीकांत वै.पाटील यांनी करताना गतवर्षातील शाळेच्या  प्रगतीचा आढावा घेतला . स्वागत श्रीकांत आप्पाजी पाटील यांनी केले. यावेळी बोलताना सरपंच भोगण म्हणाल्या पालकांनी सर्व बाबतीत सक्षम असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आपल्या मुलांना शिकवावे .मुलांचा खरा सर्वांगिन विकास व प्रगती जि प शाळेतच होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. तसेच येथे मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, मध्यान्न भोजन, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती सह अनेक शासकीय योजनांचा मिळणारा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिलीत नवीन दाखल  तसेच इंग्रजी  माध्यमाच्या व अन्य शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .शाळेत नवीन रुजू झालेले अध्यापक गणपती लोहार यांचे स्वागत लक्ष्मण धर्मोजी यांच्या हस्ते  करण्यात आले .यावेळी ग्रामपंचायत सदस्य पी एस भोगन , विनायक राजगोळकर ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इम्तियाज मुल्ला,परशराम जाधव, जयश्री पाटील, बापू होन्याळकर, समिया बाडकर ,माधवी पाटील, आदींसह राम सुर्वे, शिवाजी राजगोळकर, स्वाती जोशी, ज्ञानेश्वर चोपडे, लता सुरंगे ,उज्ज्वला नेसरकर, भावना अतवाडकर आदी पालक शिक्षक उपस्थित होते. आभार कविता पाटील यांनी मानले.



No comments:

Post a Comment